सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवशीही राज्यात चांगला पाऊस होणार आहे. या महिन्यात एकूणच राज्यात सर्वच भागांत चांगला पाऊस झाला. यामुळे राज्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढला. अनेक शहरांचा पाणी प्रश्न मिटला तसेच रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. आजही पुणे हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हा पाऊस पडणार आहे..त्यामुळे हवामान विभागाने काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
त्यामुळे कोकण किनारपट्टी आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गोव्यापासून कोकण किनारपट्टीपर्यंत हवामान विभागाने आँरेज अलर्ट दिला आहे