चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज सातवा दिवस आहे. आज भारतीय खेळाडू अॅथलेटिक्स, स्क्वॅश, नेमबाजी, हॉकी, वेटलिफ्टिंग, टेनिस इत्यादी खेळांमध्ये चमक दाखवणार आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धेत सातव्या दिवशी भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनी टेनिसमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले असून भारताचे हे टेनिसमधले पहिले सुवर्णपदक आहे.
रोहन बोपन्ना आणि ऋतुराज भोसले यांनी टेनिस मिक्स्ड डबलच्या फायनलमध्ये शानदार कामगिरी केली. बोपन्ना-भोसले जोडीने तैपेईच्या जोडीचा 2-6, 6-3 आणि 10-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.
भारताच्या नेमबाजांनी शूटिंगमध्ये दमदार कामगिरी केली आहे. शूटिंगमध्ये भारताने आतापर्यंत 19 पदकांवर नाव कोरले आहे. यामध्ये 9 गोल्ड, 8 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. नेमबाजीत भारताला आजचेपहिले पदक मिळाले आहे. एसके सरबज्योत सिंग आणि दिव्या टी.एस यांच्या जोडीने मिश्र प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे. सरबज्योतने आपल्या वाढदिवशी रौप्य पदक जिंकून देशाला भेट दिली आहे. लढतीनंतर आयोजकांनी त्याच्यासाठी हॅपी बर्थडे गाणेही वाजवले आहे.