मुंबईत इंडिया आघाडीकडून आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.मात्र या पदयात्रेतील कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.यामुळे कार्यकर्ते आणि नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी यावेळी जोरजोरात घोषणाबाजी केली आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त इंडिया आघाडीचा लॉंग मार्च काढण्यात येत आहे. इंडिया आघाडीतील जवळजवळ सगळेच घटक पक्षांचे नेते, कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.मात्र या लाँग मार्चला परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले गेले. इंडिया आघाडीच्या पदयात्रेसाठी या मोर्चासाठी वर्षा गायकवाड, सचिन अहिर उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण तरीसुद्धा हा मोर्चा निघाला असल्याचे सांगण्यात येत आहे.