दिल्ली-एनसीआरसह हरियाणा, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थानच्या मोठ्या भागात आज भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता आणि त्याची खोली पृथ्वीपासून १० किलोमीटर खाली होती. नेपाळमध्ये आज दुपारी २:२५ वाजता ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला तर २:५१ वाजता ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला.
https://x.com/ANI/status/1709138291604496754?s=20
सुमारे एक मिनिट हे भूकंपाचे धक्के जाणवत होते . उंच इमारती असलेल्या भागात हा भूकंप मोठ्या तीव्रतेने जाणवला. एकापाठोपाठ एक धक्के जाणवत राहिले. दिल्ली-एनसीआरमध्ये लोक इमारतींमधून बाहेर धावले आणि बाहेर गर्दी दिसून आली.नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.६ इतकी नोंदवण्यात आली होती मात्र ती खूप जास्त जाणवली.