आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 54 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकल्याबद्दल मुष्टियोद्धा प्रीती पवारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.19-वर्षीय मुलीच्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो . तिचे सातत्य, निष्ठा आणि कधीही हार न मानण्याच्या वृत्तीचा हा दाखला आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी महिलांच्या 54 किलो वजनी गटात एका प्रतिभावान मुष्टियोद्धयाच्या कठोर परिश्रमाने कांस्य पदक मिळवून दिले आहे.
प्रीती पवारच्या या उत्कृष्ट कामगिरीचा अभिमान वाटतो.तिचे सातत्य,समर्पण आणि कधीही हार न मानण्याच्या वृत्तीचा हा दाखला आहे.”