मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात मनोज जरांगे पाटील सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत.आज त्यांची सोलापूरमध्ये जाहीर सभा होणार आहे.तसेच पंढरपूर, मंगळवेढा आणि कुर्डूवाडीमध्येही त्यांची सभा पार पडेल.सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे.याशिवाय जिल्ह्यात इतर ठिकाणी देखील जरांगे पाटील यांच्या सभा होणार आहेत.येत्या १४ ऑक्टोबर रोजी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे सकल मराठा समाजाची मराठा आरक्षणबाबत सभा पार पडणार आहे.त्या सभेच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी १२ जिल्ह्यांमध्ये दौरा काढलेला आहे.