दिल्ली, राजस्थान, हिमाचल, हरियाणा, उत्तराखंड या राज्यांमधून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.तसेच मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेशच्या विविध भागांमधून हळूहळू मान्सून परतण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागण्यास सुरवात झाली आहे.
भारतातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असताना महाराष्ट्रातही थंडीची चाहूल लागण्यास सुरवात झाली आहे. मात्र याच वेळी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत कोकण आणि विदर्भात मूसळधार, तर पुढील ४८ तासांत मुंबई, पुणे, ठाणे येथे पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरील क्षेत्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पावसासाठी पूरक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळू शकते.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ह्या वर्षी सरासरीच्या ९४.४ टक्के पाऊस झाला आहे.जो गेल्या ५ वर्षातला कमी पाऊस समजला जात आहे. भारतात सरासरीच्या १०६ टक्के हा सामान्य पाऊस समजला जातो