चीन येथे चालू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने जोरदार मुसंडी मारली आहे. आज भारताने २१ वे सुवर्णपदक आपल्या नावावर केले. दिवसभरातील हे तिसरे सुवर्णपदक आहे. भारताने तिरंदाजीत सुवर्णपदक कमावत आज खाते उघडले होते त्यानंतर स्क्वॉश मिक्समध्ये भारताला सुवर्ण मिळाले त्यानंतर आता पुरुष कंपाऊंट टीमने देखील तिरंदाजीत सुवर्णपदक नावावर केले आहे .तिरंदाजीमध्ये भारतीय पुरुष कंपाऊंट टीममधील प्रवीण देवताले, अभिषेक वर्मा आणि प्रथमेश जावकर यांनी २१ वे सुवर्ण जिंकले आहे.
स्क्वॉश मिक्स डबल इवेंटमध्ये भारताच्या दीपिका पल्लीकल आणि हरिंदर पाल संधू यांच्या जोडीने सुवर्ण पदक आपल्या नावावर केले. तर दुसरीकडे बॅडमिंटनमध्ये एचएस प्रणॉयने पुरुष एकेरी स्पर्धेत आपले पदक निश्चित केले आहे.
पदकांच्या संख्येत भारत आशियाई देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर चीन, दुसऱ्या क्रमांवर जापान तर तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरिया हे देश आहेत.