आयसीसीच्या वन डे विश्वचषकाला आजपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन संघांमधल्या सामन्याने या विश्वचषकाची लढाई सुरु झाली आहे .न्यूझीलंडच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
न्यूझीलंडच्या टीमचे नेतृत्व कर्णधार टॉम लॅथम टॉस करणार आहे तर इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व जोस बटलरकडे आहे.सामना सुरु झाल्यापासून काही वेळानंतर इंग्लंडचा संघ ३०० धावांच्या दिशेने वाटचाल करता असला तरी जोस बटलर बाद झाल्याने इंग्लंडचा अर्धा संघ तंबुत परतला आहे.त्यानंतर जो रुटने तुफान फलंदाजी करत 70 धावांचा टप्पा ओलांडला मात्र नंतर तोही बाद झाल्यामुळे इंग्लंड संघाला जबरदस्त धक्का बसला आहे.
न्यूझीलंडचा संघ दोनवेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला असला तरी चॅम्पियन होऊ शकलेला नाही. दुसरीकडे, इंग्लंड एकदिवसीय तसेच टी-20 मध्ये विश्वविजेता आहे. त्यामुळे इंग्लंडचे पारडे जड असेल असे मानले जात होते मात्र आता न्यूझीलंडच्या खेळावर आजचे त्यांचे भवितव्य ठरणार आहे.