सीरियाच्या सैन्य अकादमीवर ड्रोन हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सीरियातील होम्स शहरात असलेल्या मिलिटरी कॉलेजमध्ये हा हल्ला करण्यात आला. हा हल्ला झाला तेव्हा तेथे पदवीदान समारंभ सुरू होता. गुरुवारी झालेल्या या ड्रोन हल्ल्यात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू तसेच अनेक जण जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे .
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सीरियाचे संरक्षणमंत्री या पदवीदान समारंभातून निघून गेल्यानंतर काही मिनीटातच या ठिकाणावर ड्रोनच्या मदतीने बॉम्ब टाकण्यात आले. मात्र अद्याप या हल्ल्यात कुठल्याही संघटनेचे नाव पुढे आलेले नाही तसेच कुठल्याही गटाने अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.
सीरीयाच्या लष्कराने या हल्ल्यासाठी आंतरराष्ट्रीय सैन्याकडून समर्थन देण्यात येत असलेल्या बंडखोरांना जबाबदार धरले आहे.यूद्धामुळे उध्वस्त झालेल्या सीरीयामध्ये आजपर्यंत झालेला सर्वात मोठा ड्रोन हल्ला मानले जात आहे. सीरीयामध्ये मागील १२ वर्षांपासून गृहयुद्ध चालू आहे.