क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा संघ आज, शुक्रवारी हैदराबाद येथे तुलनेने दुबळय़ा असलेल्या नेदरलँड्सविरुद्ध आपला सलामीचा सामना खेळणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचे पारडे जड मानले जात असून कर्णधार बाबर आझमच्या कामगिरीवर चाहत्यांचे लक्ष असेल.राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी सीम बॉलर्सना उपयुक्त असेलच, पण फलंदाजांसाठी सुद्धा फायदेशीर ठरते या ठिकाणीही खेळपट्टीसाठी लाल माती, काळी माती आणि या दोन्हींचे मिश्रण वापरले जाते.
पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात आतापर्यंत 6 वनडे सामने झाले आहेत आणि पाकिस्तानने ते सर्व जिंकले आहेत.त्यामुळे पाकिस्तानची बाजू उजवी असली नेदरलँड पारडे पलटवण्यात सक्षम आहे हे त्यांना विसरुन चालणार नाही.
दुपारी दोन वाजता या सामन्याला सुरवात झाली असून नेदरलँड्स कॅप्टनने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडले आहे. त्यामुळे आता नेदरलँड्स पाकिस्तानच्या बॅटिंगला किती धावांपर्यंत रोखतात याकडे आता क्रिकेट प्रेमींचे लक्ष असणार आहे.पाकिस्तानचे नेतृत्व बाबर आझम करणार आहे.तर स्कॉट एडवर्ड्स याच्याकडे नेदरलँड्सची सूत्रे आहेत.