चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई गेम्समध्ये भारताचा डंका सुरूच आहे.पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारताने कबड्डीमध्ये सेमी फायनलमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे.तसेच ६१४ अशा फरकाने पाकिस्तानला चारी मुंड्या चित करत कबड्डीच्या अंतिम फेरी प्रवेश करत आणखी एक पदक निश्चित केले आहे.
भारताच्या महिला कबड्डी संघाने देखील नेपाळचा ६१ – १७ असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. त्यामुळे कबड्डीतली भारताची दोनही पदके पक्की झाली आहेत.
भारताने आज आपली पदकसंख्या आता ९० वर पोहचवली आहे. भारतने २१ सुवर्ण पदके ३३ रौप्य आणि ३६ कांस्य पदके जिंकली आहेत. भारताने महिला रेगू संघाने सेमी फायनलमध्ये थायलंडचा पराभव करत ऐतिहासिक कांस्य पदक पटकावले. याचबरोबर महिला आर्चरीमध्ये देखील भारताने कांस्य पदकाची कमाई केली आहे. तर पुरूषांनी रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. तर फिरकीपटू साई किशोरच्या अपवादात्मक गोलंदाजीच्या कामगिरीने, कर्णधार रुतुराज गायकवाड आणि टिळक वर्मा यांच्या स्फोटक फलंदाजीच्या प्रदर्शनाने भारत आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रिकेटच्या अंतिम फेरीत पोचला आहे.