भारतासाठी आज सर्वात मोठा आणि ऐतिहासिक दिवस आहे. भारताने आशियाई स्पर्धेत एक दोन नव्हे तर तब्बल १०० पदके जिंकत जोरदार कामगिरी केली आहे. यावेळी भारताने २५ सूवर्ण पदकांचीही लयलूट केली आहे.भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे आशियाई स्पर्धेत भारताचा दबदबा वाढला आहे. ७२ वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा पदकांची लयलूट करत इतिहास घडवला आहे.
चीन येथे चालू असलेल्या आशिया स्पर्धेचा आज १४ वा दिवस आहे. या १४ दिवसातच भारताने मोठी कामगिरी करत एकूण १०० पदके जिंकली आहेत. यात २५ सूवर्ण, ३५ रजत आणि ४० कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताच्या ज्योती वेन्नम हिने तीरंदाजीत गोल्ड मेडल मिळवले आहे. तर अदिती स्वामीने कंपाऊंड तीरंदाजीत कांस्य पदक जिंकले आहे. महिला कबड्डी टीमनेही सूवर्ण पदकाची कमाई करून भारताचा तिरंगा फडकवला आहे.या दोन पदकाच्या बळावर भारताच्या पदकांची संख्या 100 झाली आहे.
या अभूतपूर्व यशाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. त्यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे.
खेळाडूंनी असामान्य असे यश आशियाई स्पर्धेमध्ये मिळवले आहे. १०० पदकांच्या विजयामुळे सर्व भारतीय नागरिक रोमांचित झाले आहेत. भारताने इतिहास रचन्यामध्ये योगदान देणाऱ्या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतो. खेळाडूंच्या असामान्य खेळीने भारतीयांचे हृदय अभिमानाने भरले आहे, असे मोदी म्हणाले आहेत.
भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. भारतीय खेळाडूंनी १०० पदले जिंकली आहेत. आपले खेळाडू आज जगात कुणापेक्षाही कमी नाही. कठिण काळात अत्यंत कठोर परिश्रम करून त्यांनी देशाला पदके मिळवून दिली आहेत. आता क्रीडा जगतात भारताचाच बोलबाला राहील असा काळ लवकरच येईल, असे ओम बिर्ला यांनी म्हटले आहे.