कॅनडातील वँकूवरजवळील चिल्लीवॅक येथे विमान दुघर्टनाग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमानामध्ये दोन भारतीय शिकाऊ पायलट होते, त्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
स्थनिक माहितीनुसार पायपर पीए-34 सेनेका हे दुहेरी इंजिन असलेले हलके विमान एका झाडावर आदळल्यने हा अपघात झाला. त्यानंतर हे दुर्घटनाग्रस्त विमान हॉटेल इमारतीच्या मागे कोसळले या दुर्घटनेत दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा दुर्दैवी अंत झाला असून त्यांची नावे अभय गडरू आणि यश विजय रामुगाडे अशी आहेत.हे दोन्ही भारतीय मुंबई येथील रहिवासी होते .स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोचले यासंदर्भात अधिक तपास सुरु आहे.
त दोन भारतीय नागरिकांशिवाय आणखी एका वैमानिकाचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.