गेल्या काही दिवसांपासून इस्रायलच्या भूमीवर हमासच्या दहशतवाद्यांकडून कारवाया केल्या जात असल्याचे दावे केले जात होते.आज सकाळी इस्रायलच्या भूमीवर गाझा पट्ट्यातून हमास दहशतवाद्यांनी तब्बल ५ हजार क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून घुसखोरी केली आहे.यासोबतच इस्रायलच्या कित्येक मिलिट्री बेसवर देखील हमासने हल्ला केला आहे. यानंतर इस्रायलमध्ये स्टेट ऑफ वॉर घोषित करण्यात आले असून या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास इस्रायलने सुरुवात केली आहे.
तेल अवीव आणि अश्कोलोन शहरांवर रॉकेट हलेला करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गाझामधून इस्रायलच्या अनेक निवासी भागांना लक्ष्य करण्यात आले आहे.
इस्रायलने गाझा पट्टीमध्ये एअर स्ट्राईक करण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलच्या एअर फोर्सने देखील एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. याठिकाणी असणाऱ्या हमास दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले जात आहे.
इस्रायलचे भारतातील राजदूत, नूर गिलॉन यांनी सध्याच्या परिस्थितीबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, की “इस्राईल हे सध्या पॅलेस्टिनी दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देत आहे. हमासने आज पहाटे आमच्या नागरिकांवर केलेला हल्ला हा वॉर क्राईम आहे. हमास आमच्या महिला, लहान मुलं आणि वयोवृद्धांना लक्ष्य करुन ठार करत आहे.”
पॅलेस्टाईनचा दहशतवादी गट असलेली हमास ही इस्लामिक जिहादी संघटना आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष फार जुना आहे. मात्र, आज 7 सप्टेंबर रोजी गाझा पट्टीतून हमासने पुन्हा एकदा इस्राइलवर हल्ला करत या वादाला तोंड फोडले आहे.