अफगाणिस्तानला पुन्हा एकदा भूकंपाचा जोरदार धक्का बसला असून या घटनेत १४ लोकांचा मृत्यू झाला असून तब्बल ७८ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला होता.त्याच भीतीच्या सावटाखाली अजून तेथील रहिवासी आहेत
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले की 6.3 रिश्टर स्केलचा भूकंप इराणच्या सीमेजवळ असलेल्या हेरात या पश्चिम शहरापासून 40 किमी अंतरावर हा भूकंप झाला सुरुवातीच्या भूकंपानंतर किमान तीन शक्तिशाली हादरे बसले आहेत.
अफगाण अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक इमारतींचे नुकसान झाले असून लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
“आम्ही आमच्या कार्यालयात होतो आणि अचानक इमारत हादरायला लागली. भिंतीचे प्लास्टर खाली पडू लागले आणि भिंतींना तडे गेले, काही भिंती आणि इमारतीचा काही भाग कोसळला.” असे हेरातचे रहिवासी बशीर अहमद यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले आहे.