विश्वचषक क्रिकेट सामन्यात यजमान भारताने आज ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव केला. भारताचा आज विश्वचषकातील पहिलाच सामना होत. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित ५० षटकांत केवळ १९९ धावा केल्या. रवींद्र जडेजा याने ३ बाद केले तर जस्मित बुमराह व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले. भारतीय संघासाठी हे आव्हान खूपच सोपे ठरले व ४१ षटकं २ चेंडूत हे लक्ष्य पूर्ण केले. विराट कोहली याने ११६ चेंडूत ८५ धावा केल्या तर सामनावीर ठरलेल्या के एल राहूल याने ११५ चेंडूत नाबाद ९७ धावा केल्या. चेन्नईतील एम ए चिदंबरम् स्टेडियम येथे हा सामना खेळला गेला. पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय तो ही ऑस्ट्रेलिया संघावर मिळवल्याने भारतीय संघाचे मनोबल उंचावले आहे.