पिंपरी- चिंचवडमध्ये ताथवडे येथील जीएसपीएम कॉलेजच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडामध्ये अवैधरित्या गॅस रिफलिंग करताना रविवारी भीषण स्फोट झाला. एकामागे एक नऊ ते दहा सिलेंडरचा या ठिकाणी स्फोट झाला.आजुबाजूच्या इमारतीपासूनच घर इमारती हादरले आहेत जेएसपीएम कॉलेजचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या हॉस्टेलमध्ये इथे राहतात घटनास्थळाच्या बाजूला अक्षर एलिमेंट या नावाची सोसायटी आहे ती पूर्ण सोसायटी हादरली असून स्फोटामुळे नागरिक घाबरलेले दिसून आले होते.त्यानंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली .
विशेष म्हणजे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची शाळा असलेल्या परिसरात हा स्फोट झाला. यामुळे आरोग्य मंत्री चांगलेच संतापले आहेत. त्यांनी आज घटनास्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करुन आजच त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.
गॅस चोरीचा काळाबजार करत असताना घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये गॅसच्या टँकरमधून अवैधरित्या कमर्शियल टाक्यांमध्ये गॅस भरला जात होता. रविवारी रात्री सुरु असलेल्या या प्रकाराच्या वेळेस भीषण स्फोट झाला. सलग नऊ टाक्यांचा स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. गॅस सिलेंडर स्फोटांचा आवाज दूरदूरपर्यंत ऐकू गेला. धुरांचे लोट काही किलोमीटरपर्यंत दिसत होते. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही.