अफगाणिस्तानमध्ये शनिवारी ७ ऑक्टोबरला भूकंपाचे हादरे बसले. मोठा भूकंपाचे हादरे बसल्यानंतर अनेक गावे उदध्वस्त झाली आहेत. तर ४,००० हून अधिक लोक ठार झाले आहेत, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
अफगाणिस्तानमध्ये सर्वात शक्तिशाली भूकंप ६. ३ रिश्टर स्केलचा होता तर दोन भूकंप ६. २ रिश्टर स्केलचे होते. या भूकंपांमध्ये सुमारे २,००० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, अशी माहिती अफगाणिस्तान राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.
तालिबान प्रशासनाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये झालेल्या हा भूकंप अनेक वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंपापैकी एक आहे. शनिवारी सकाळी ७ ऑक्टोबरला अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील शहरांमध्ये भूकंप झाला. हेरास, बडघिस आणि फराह प्रांतात भूकंपाचे जोरदार हादरे बसले आहेत.