आज पाकिस्तान क्रिकेट संघ एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेशी भिडणार आहे.हैदराबाद मध्ये दुपारी २ वाजता या सामन्याला सुरवात झाली आहे. श्रीलंकेकडून फलंदाजीला सुरवात झाली आहे.
एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तान आणि श्रीलंका आतापर्यंत ८ वेळा आमनेसामने आले आहेत. यातील ७ सामन्यात पाकिस्तानच्या संघाने विजय मिळवला आहे. तर, एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. म्हणजेच विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाला पाकिस्तानविरुद्ध एकही सामना जिंकता आला नाही.
तसेच श्रीलंकन संघाला दुखापतीचा फटका यंदाच्या विश्वकरंडकात बसत आहे. फिरकीपटू वनिंदू हसरंगा, वेगवान गोलंदाज दुशमंता चमीरा हे महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे विश्वकरंडकामधून बाहेर गेले आहेत. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत पाकच्या फलंदाजांचा कस लागू शकतो.