जानेवारी २००६ ला बऱ्यापैकी मवाळ फतह पार्टीला निवडणुकीत हरवून हमास पॅलेस्टाईन मध्ये सत्तेवर आली. ह्या निवडणुका आंतरराष्ट्रीय देखरेखीत झाल्या. हमास सत्तेत आल्याचा अमेरिका आणि इस्राएल दोघांना मोठा धक्का बसला.
त्यानंतर वेळोवेळी इस्त्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष होत राहिले पण प्रत्येक वेळी इस्रायली सैन्याने फक्त यादीतील हमास नेते मारण्यावर भर दिला होता.
आत्ताच्या हमास हल्ल्यानंतर इस्रायलने पहिल्यांदाच हमासच्या सत्तेची केंद्रे, प्रचार विभाग आणि आर्थिक, व्यापारी केंद्रे यांना थेट आपलं लक्ष केलं आहे.
१९७३ च्या योम किप्पुर हल्ल्यात एका दिवसात ३५० इस्रायली मारले गेले यावेळी एका दिवसात ७०० इस्रायली मारले गेले, याचा परिणाम म्हणून इस्राएल हमासचे अस्तित्व कायमचे पुसून टाकण्याच्या निश्चयाने युद्ध आखत आहे.
गेल्या ३ दिवसात इस्रायली सैन्याने ३५०० हवाई हल्ले केले आणि यात हमास सरकारच्या मंत्रालयाच्या इमारतीत नष्ट केल्या.
इस्रायली सैन्य प्रवक्ता रियर अडमिरल डानीयल हागारी यांनी सैन्याची रणनीती आणि हमास ला कायमचे संपवण्याच्या निर्धार काल आपल्या विस्तृत ब्रिफिंग मध्ये व्यक्त केला.