नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अर्थात एनआयएने दिल्ली, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि इतर राज्यांमध्ये बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या संबंधित ठिकाणावर छापेमारी करण्यास आज सकाळपासून सुरवात केली आहे.
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 ऑक्टोबरला सकाळपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे.तसेच उत्तर प्रदेशमध्ये, लखनौ, बाराबंकी, बहराइच, सीतापूर आणि हरदोई येथेहे छापे सुरू आहेत, अ लखनौमधील एकाच परिसरातील तीन घरांवर एनआयए आणि निमलष्करी दलाने छापे टाकले.आहेत.
तर महाराष्ट्रात मुंबई आणि इतर शहरांमध्ये छापे टाकण्यात आले, असे एएनआयने वृत्त दिले आहे. एनआयए अधिकाऱ्यांचे एक पथक अब्दुल वाहिद शेख याच्या मुंबईतील विक्रोळी भागातील निवासस्थानी पोहोचले आहे. शेख हा ७/११ च्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील निर्दोष आरोपी आहे
देशातील वेगवेगळ्या शहरात कारवाई सुरू असून दिल्लीतील छापेमारीचा व्हिडीओ एनआयएने पोस्ट केला आहे.