भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफ याची आज पाकिस्तानात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तो पाकिस्तानात लपून बसला होता. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्याने जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
शाहिद लतीफ हा पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आणि पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. तो पाकिस्तानातील सियालकोटमध्ये लपून बसला होता.पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार सियालकोच्या बाहेर एका मशिदीत दहशतवागी शाहिद याची हत्या करण्यात आली. हल्लेखोर मोटरसायकलवर आले होते आणि त्यांनी शाहिदवर गोळ्या झाडल्या त्यानंतर ते फरार झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून हल्लेखोरांचा शोध घेणे सुरू आहे.
एनआयएकडून शाहिदविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.पंजाबमधील पठाणकोट येथील 2016 मध्ये एअरबेसवर दहशतवादी हल्ला त्या हल्ल्यातही जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा त्यामध्ये हात होता. या हल्ल्यात लष्कराचे 7 जवान शहीद झाले होते. पठाणकोट एअरफोर्स स्टेशन हे लष्कराच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने त्याला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते.तपासानंतर तपासानंतर शाहिद लतीफ यानेच या दहशतवाद्यांना हत्यारे आणि इतर मदत पुरवल्याचे समोर आले होते. लतीफ याला १९९६ मध्ये अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती.