चांद्रयान ३ आणि आदित्य एल-१ मोहिम यशस्वीपणे राबविल्यानंतर आता भारताची पहिली मानव मोहीम असलेले गगनयान लवकरच अवकाशात झेपावण्यासाठी सज्ज होणार आहे.. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून २१ ऑक्टोबर रोजी गगनयान मोहिमेपूर्वी यानाचे पहिले चाचणी उड्डाण केले जाणार आहे. तर पुढच्या वर्षीच्या अखेरीस भारतीय अंतराळवीरांना ठेवणार्या क्रू मॉड्युलची चाचणी करण्यासाठी तयार करण्यात आलेले वाहन विकास (टीव्ही-डी-1) याची देखील चाचणी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात घेण्यात येणार आहे.
गगनयानास टेस्ट व्हीकल अबॉर्ट मिशन-१ संबोधले जात आहे. ते आऊटर स्पेसपर्यंत पाठवण्यात येईल. त्यानंतर, ते पुन्हा जमिनीवर परतणार आहे.