शिवसेनेच्या १६आमदारांच्या अपात्रतेवर आज सुनावणी पार पडणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी आज दुपारी २ वाजता पार पडणार आहे. या सुनावणीशी संबंधित सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची ठाकरे गटाने मागणी केली होती.तसेच जी -20 देशांच्या सभागृह अध्यक्षांची बैठक दिल्लीत होणार आहे. त्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
आजच्या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला जाणार असून ते सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेणार आहेत.
ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने राहुल नार्वेकर यांच्यावर आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणीमध्ये दिरंगाई करत असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.