इस्रायल आणि हमासमधील युद्ध सहाव्या दिवशीही सुरु आहे. या युद्धजन्य परिस्थितीत नोकरी, शिक्षण आणि इतर कारणांनी इस्रायलमध्ये असलेले भारतीय नागरिक अडकले आहेत त्यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून ‘ऑपरेशन विजय’ राबवण्यात येत आहे. गुरुवार, 12 ऑक्टोबर रोजी यासाठीचे पहिले विमान उड्डाण घेणार आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.इस्रायलमध्ये २० हजारांहून अधिक भारतीय आहेत.त्यांच्या सुटकेसाठी विशेष चार्टर विमाने आणि इतर व्यवस्था करण्यात येत आहे.परदेशात राहणा-या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे परराष्ट्र मंत्र्यांनी म्हंटले आहे. वृत्तसंस्था पीटीआयने मुंबईतील इस्रायलचे महावाणिज्यदूत कोबी शोशानी यांच्या हवाल्याने असे सांगितले आहे की, इस्रायलमध्ये २० हजारांहून अधिक भारतीय आहेत. दूतावासाकडून गुरुवारच्या विशेष विमानासाठी नोंदणीकृत भारतीय नागरिकांच्या पहिल्या तुकडीला ई-मेल पाठवण्यात आले आहेत. त्यानंतरच्या विमानासाठी इतर नोंदणीकृत भारतीयांना ई-मेल आणि इतर माध्यमातून संदेश पाठवले जाणार असल्याचे इस्त्रायलमधील भारतीय दूतावासाने माहिती दिली आहे. गरज पडल्यास भारतीय नौदलाच्या युद्धनौकांचा सुद्धा वापर केला जाईल