राज्यातील टोल नाक्यावरील टोल संदर्भात सायंकाळी ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलवली आहे. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. अविनाश जाधव,रवीन्द्र मोरेसह अन्य काही जण उपस्थित राहणार आहेत.टोलनाक्यासंदर्भात राज्यसरकारच्या भूमिकेवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
राज्यातील टोलवसुली विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल दरवाढीवरून राज्य सरकारला इशारा दिल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यांवर आंदोलने केली होती.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या या भेटीनंतर राज ठाकरे हे माध्यमांना माहिती देणार आहेत आणि टोलच्या मुद्द्यावर आपली पुढील भूमिकाही स्पष्ट करतील असे सांगण्यात येत आहे.