शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज पुन्हा एकदा सुनावणीला सुरवात झाली आहे. यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार अजय चौधरी आणि शिवसेना ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत विधानभवनात उपस्थित आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून त्यांचे वकील अनिल साखरे उपस्थित आहेत.
शिंदे गटाचे वकील अनिल साखरे याचिका एकत्र करु नका या भूमिकेवर ठाम आहेत तसेच प्रत्येक याचिकेची कारणं वेगळी आहेत त्यामुळे प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घ्या अशी शिंदे गटाने मागणी केली आहे तर याचिका एकत्रच घ्या असा ठाकरे गटाकडून युक्तिवाद यावेळी करण्यात आला आहे.
दरम्यान प्रत्येक याचिकेतील मुद्दे वेगळे असताना याचिका एकत्र करण्यासंदर्भातील मागणीवर निकाल कसा देता येईल, असे मत विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी मांडले असल्याची माहिती समोर येत आहे.