आमदारांच्या अपात्रतेबाबबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना तातडीनं निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने केली आहे त्यावर आज सकाळी सुनावणी होणार आहे.
आमदारांच्या अपात्रते संदर्भात सुनावणीपूर्वी ठाकरे गटाकडून अनिल देसाई आणि अनिल परब सुप्रीम कोर्टात दाखल झाले आहेत. तसेच शरद पवार गटाचे . सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड कोर्टात दाखल झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटातील आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
दरम्यान सुप्रीम कोर्टातही आता शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढाई दिसून येत आहे. शरद पवार गटाविरोधात अजित पवार गटाने सुप्रीम कोर्टात 3 हस्तक्षेप याचिका दाखल केल्या असून नरहरी झिरवळ, छगन भूजबळ आणि अनिल पाटील यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.