पाऊस परतीच्या मागावर असतानाच मागील काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागामध्ये उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सकाळ आणि दुपारच्या वेळी तापमानात होणारी वाढ पाहता हवामान खात्याकडूनही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जाता जाता पाऊस राज्यातील काही भागात बसरणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
३ ऑक्टोबरपासून पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र वातावरणातील उष्मा वाढल्याने घामाच्या धारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.सकाळी गारवा आणि दुपारी कडक ऊन तर सायंकाळी होत ढगाळ वातावरणामुळे प्रचंड उष्मा वाढला आहे.गेल्या दोन दिवसांपासून वातावरणातही कमालीचा उकाडा जाणवत आहे. सूर्य आग ओकत असून अंगाची लाहीलाही होत आहे. घामाच्या धारांमुळे नागरिक बेजार झाले आहेत. आणखी आठवडाभर तापमानाचा पारा चढाच राहण्याची शक्यता आहे असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. . बदलत्या हवामानामुळे साथीचे आजारही बळावले आहेत.हवामान विभागाने जाहीर केल्यानुसार, राज्यात पुढील पाच दिवस हवामान उष्ण आणि कोरडे राहण्याचा अंदाज आहे.