एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शनिवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर महामुकाबला रंगणार आहे. विश्वचषकातील या सर्वात रोमांचक सामन्याची सर्वांनाच प्रतिक्षा आहे.
या दोन्ही संघांवरही जिंकण्याचे तितकेच दडपण असणार आहे विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत दोनही संघ प्रत्येकी दोन सामने जिंकलेत. त्यामुळे विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी रोहितसेना आणि बाबरसेना सज्ज झाले आहेत.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मावर जास्त दबाव असणार आहे, कारण विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध पहिल्या पराभवाचा ठपका पडू नये यासाठी
कर्णधार रोहित शर्मा प्रयत्नशील असणार आहे. या सामन्यात रोहित शर्माबरोबर भारताचा आणखी एक खेळाडू भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात रोहित शर्माबरोबर हार्दिक पांड्या सहकर्णधार असणार आहे. तर पाकिस्तानच्या क्रिकेट टीमची धुरा बाबर आझम सांभाळणार आहे.
वनडे इतिहासात पाकिस्तान संघाचे पारडे जड असले तरी विश्वचषकात भारतच वरचढ राहिला आहे. आतापर्यंत या दोन्ही संघामध्ये सातवेळा सामना झाला आहे. या सर्व 7 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.