मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण थांबवत मराठा आरक्षणासाठीचा सरकारला दिलेला आता अल्टिमेटम संपला आहे. आज अंतरवारी सराटी गावात सभा घेत जरांगे पाटलांनी जनतेशी संवाद साधला .तसेच राज्यसरकारलाही थेट इशारा दिला.
१० दिवसांच्या आत मराठा समाजाला आरक्षण द्या. त्यापेक्षा जास्त दिवस वाट पाहण्याची आमची तयारी नाही. आता मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही, आम्ही सरकारला शेवटची विनंती करतो. मराठा समाजासाठी गठीत केलेल्या समितीचं काम आता बंद करा. तुमचे आणि आमचे असे बोलणे झाले होते की चार दिवसांत कायदा पारित होणार नाही, आम्हाला एक महिन्याचा वेळ द्या, आधार घेऊन कायदा पारित करतो, असे आश्वासन तुम्ही दिलं होतं. आता पाच हजार पानांचा पुरावा समितीला मिळाला आहे. त्याचा आधार घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा. असे म्हणत जरांगे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वाना इशारा दिला आहे.