विश्वचषक स्पर्धेमध्ये आज भारताच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे आज पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सेनापती बाबर आझम तंबूत परतल्यानंतर इतर सैनिकांनी भारताच्या गोलंदाजीपुढे सपशेल शरणागती पत्कारली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ ४२.४ षटकात १९१ धावांपर्यंत मजल मारु शकला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम याने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. त्याशिवाय मोहम्मद रिजवान याने ४९ धावांचे योगदान दिले.भारताकडून बुमराह, सिराज, हार्दिक अन् कुलदीप यांच्या भेदक माऱ्याने पाकिस्तानला १९२ धावांमध्ये रोखले .
आता भारताला विजयासाठी १९२ धावांचे आव्हान असणार आहे. आज टीम इंडियाच्या ५ गोलंदाजांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या आहेत. . जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारताच्या गोलंदाजांनी आज एकही मोठी भागिदारी होऊ दिली नाही. कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा यांनी धावगती रोखल्यामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजांवर प्रेशर वाढले.नरेंद्र मोदी स्टेडिअमची खेळपट्टी आता संध्याकाळी फलंदाजीसाठी जास्त अनुकूल ठरत असल्यामुळे भारत सहजपणे १९२ धावांचे आव्हान पार पाडेल .