इस्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आजचा १० वा दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. तसेच शेकडो सैनिक आणि दहशतवादीदेखील या युद्धात मारले गेले आहेत.दरम्यान,या युद्धात दोन भारतीय वंशाच्या महिला सैनिक शहीद झाल्याची बातमी समोर आली आहे.
लेफ्टनंट ऑर मोजेस (२२) आणि इन्स्पेक्टर किम डोक्राकर अशी या हमासच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय वंशाच्या महिला सैनिकांची नावे आहेत.ऑर मोजेस होम फ्रंट कमांडमध्ये कार्यरत होती, तर किम डोक्राकर सीमा पोलीस दलात तैनात होती. यांपैकी मोसेस ही होम फ्रन्ट कमांड तर कीम डोक्राकर बॉर्डर पोलीस ऑफिसमध्ये तैनात होती. इस्राइलमधील भारतीय समुदायाने या हल्ल्यांमध्ये मूळ भारतीय असलेल्या लोकांच्या मृत्यूंची संख्या वाढू शकते अशी भीती व्यक्त केली आहे.
काही वर्षांपूर्वी भारतातील लोक इस्राइलला स्थायिक झाले होते त्यांनंतर त्यांच्या पुढच्या पिढ्या या इस्राइलमध्येच जन्मल्या. त्यामुळे त्यांना इस्राइलचे नागरिकत्व मिळालं आहे. पण यातील बहुतांश भारतीय लोक हे इतर धर्माचे होते तर काहींनी इस्राइलमध्ये स्थायिक झाल्यानंतर ज्यू धर्म स्विकारला. याचप्रकारे इस्राइलकडून लढताना मृत्यू पावलेल्या या दोन महिला देखील धर्माने ज्यू होत्या.