सातारा मध्ये काल १६ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास 3.3 रिश्टल स्केलचा भूकंप जाणवला आहे.
हा धक्का सौम्य स्वरूपाचा असल्याने कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून २४ किलोमीटर अंतरावरील वारणा खोऱ्यातील चांदोली गावाच्या पूर्वेस ७ किलोमीटर अंतरावर होता . या भूकंपामुळे धरणाला कोणतीही हानी पोचली नसल्याचे वृत्त धरण व्यवस्थापनाने दिले आहे.