महाराष्ट्र आशियाई देशांमध्ये सर्वाधिक निर्यात करणारे अग्रेसर राज्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आसियान (ASEAN) राष्ट्रांच्या संघटनेतील देशांच्या राजदूतांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. भारत आणि आशियाई राष्ट्रांमधील परस्पर संबंध अधिक दृढ होण्यासाठी प्रयत्न करतानाच महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
वर्षा निवासस्थानी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजदूतांचा आणि उच्चायुक्तांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, विकास आयुक्त दीपेद्रसिंह कुशवाह आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी शिष्टमंडळामध्ये ब्रुनोई आणि सिंगापूरचे उच्चायुक्तांसह कम्बोडीया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम या देशांच्या राजदूतांचा समावेश होता.
Tags: NULL