आज नवी दिल्लीतील विज्ञान भवनात 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आज सिनेसृष्टीतील अनेकांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला.विजेत्यांची नावे सप्टेंबरमध्ये आधीच जाहीर करण्यात आली होती.विजेत्यांना भारताचे राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार विजेत्यांना प्रशस्तीपत्र आणि मेडल प्रदान करण्यात आले .यावेळी अभिनेत्री आलिया भट्टला ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शूजित सरकारच्या ‘सरदार उधम’ या ऐतिहासिक चित्रपटालाही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा किताब जिंकण्याबरोबरच, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी (अविक मुखोपाध्याय), सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी (सिनॉय जोसेफ), सर्वोत्कृष्ट निर्मिती डिझाइन (दिमित्री मलिक आणि मानसी ध्रुव मेहता) आणि सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाईन (वीरा कपूर ई.) असे पुरस्कारही मिळाले.तसेच वहिदा रहमान यांनाही दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला . यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार सलील कुलकर्णींच्या ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाने जिंकला आहे. सलील यांनाही आज राष्ट्रीय पुरस्कारदेऊन गौरवण्यात आलं आहे.. पल्लवी जोशीला काश्मीर फाइल्ससाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.