पुण्यातील ससून रुग्णालयातून पळालेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला अखेर अटक करण्यात आली आहे. १५ दिवसांपासून ललित पाटील फरार होता. त्याच्या तपासासाठी १० पोलीस पथके नेमण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या साकीनाका आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ड्रग्स माफिया ललित पाटीलला पकडलेत्याला चेन्नईतून अटक केली आहे. आज दुपारी ललितला पुण्यात आणले जाणार असून त्यानंतर कोर्टात सादर केले जाणार आहे. दरम्यान याप्रकरणी थोड्याच वेळात मुंबई पोलिस पत्रकार परिषद घेणार आहेत.
२ ऑक्टोबर २०२३ ला ललित पाटील पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून पळून गेला होता.तेव्हापासून त्याचा कसून शोध घेतला जात होता.त्याने केलेल्या ड्रग्स तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्याने राज्यातील मोठ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश झाला.दरम्यान, मुंबई पोलिसांच्या साकीनाका पोलिसांनी गुप्तपणे ललितच्या नाशिकच्या कारखान्यावर छापा टाकत ३५० कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले. त्याच्या भावाला आणि आणखी एका साथीदाराला अटक करण्यात आली. मात्र, ललित पाटील हा फरार होता.