या देवी सर्वभूतेषु माँ कूष्माण्डा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
कुष्मांडा !
दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव ‘ कुष्मांडा’ आहे.
कुष्मांड म्हणजे कोहळा
या देवीला कोहळ्याचा बळी दिला जातो
जेव्हा या चराचर सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती अशी मान्यता आहे. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे.
देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे.
या देवी रुपाला आठ भुजा आहेत. म्हणून ती अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या हातात क्रमश:
कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे तर आठव्या हातात जपमाळा आहे.ही सिंहवाहिनी आहे.
नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्तिदेवतेचा उत्सव.
प्रत्येक देवीरुपाचे निरीक्षण केले तर या जाज्वल्य शक्तीची प्रचिती येते. अशी उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते.
सुजाता अविनाश कांबळे
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र