पुण्यातील प्रसिद्ध नीळकंठ ज्वेलर्सच्या मालकांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. बाणेर, हडपसर आणि मगरपट्टा परिसरातील नीळकंठ ज्वेलर्सच्या शाखांवर आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे.
आयकर विभागाच्या ४० वाहनातून आलेले आयकर अधिकारी छापेमारी करत आहेत. सोन्याच्या खरेदी विक्री सह इतर व्यवहाराबाबत तपासणी केली जात आहे.मात्र अद्याप या छापेमारीचे कारण समोर आलेले नाही.अधिकाऱ्यांनी अनेक कागदपत्रांची तपासणी केली आहे. तर काही कागदपत्रे ही जप्त करण्यात आले आहे.