एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी आज पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना खेळला जात आहे.
सध्या भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. तर बांगलादेश संघाने तीनपैकी एक जिंकला आहे आणि दोन गमावले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना आज पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे.
थोड्याच वेळात या दोन्ही संघात चुरशीचा सामना बघायला मिळणार असून बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज नियमित कर्णधार शकीब अल हसन बांगलादेशकडून खेळत नाहीये. त्याच्या संघासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. शाकिब हा संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याच्या जागी नजमुल हसन शांतो कर्णधार आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीच निवडणार होतो, असे सांगितले आहे