मराठा आरक्षणासाठी उपोषण करुन मोठा लढा उभा करणारे मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीनंतरआज पुणे जिल्ह्यात सभा होणार आहेत. पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी आज जरांगे पाटील सभा घेणार आहे. या सभेसाठी लाखो मराठे पुन्हा एकवटल्याचे पाहायला मिळणार आहे.
मनोज जरांगे पाटील सध्या मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहे. त्यांनी सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. मात्र त्यापूर्वीच जरांगे पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे त्यांच्या दौऱ्यातून दिसून येत आहे.
पुणे जिल्ह्याचा मनोज जरांगे पाटील यांचा दौरा आज शिवनेरी किल्ल्यापासून सुरु झाला असून त्यानंतर राजगुरुनगर आणि बारामतीमध्ये जरांगे पाटील यांची सभा होणार आहे.