राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने कंत्राटी कर्मचारी भरतीचा जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी कर्मचारी भरतीचा जीआर रद्द करण्यात येणार असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच आधीच्या सरकारने केलेले पाप आमच्या माथी नको, असेही बोलत त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे.शिंदे फडणवीस सरकारकडून सुरू असलेल्या कंत्राटी भरतीविरोधात विरोधक आरडाओरडा करत आहेत त्याला प्रत्युत्तर देताना कंत्राटी भरतीचा पहिला जीआर काँग्रेसने काढला होता असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
हे कंत्राटीकरणाचे पाप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. आणि आता तेच त्याविरोधात आंदोलन करत आहेत . कंत्राटी भरती कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाप आहे. त्यांच्या पापाचे ओझे आमच्या सरकारने का उचलावे? असा सवाल करत ही कंत्राटी भर्ती रद्द केल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.