दुर्गेचे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते.
कत महर्षींच्या कात्य नावाच्या पुत्राने अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली.
भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला.
जेव्हा पृथ्वीवर महिषासुराचा अत्याचार वाढला तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला निर्माण केली
महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला ‘कात्यायनी ‘ देवी असे नाव पडले.
तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. अशी ही कथा पुराणात आहे. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते
प्रोत्साहन मिळालं की चैतन्य स्फुरतं आणि मग काहीच अवघड वाटत नाही हे या शक्ती रुपातून निदर्शनात येते
शत्रू कितीही प्रबळ असला तरी आपल्यातील शक्तीचा शोध घेतला तर त्याला नामोहरम करणे सहज साध्य असते स्वतःतील चेतनेला जागृत केलं तर रोजच्या व्यवहारात असे कितीतरी प्रश्न चुटकीसरशी सोडवून पुढील मार्गक्रमणा करु शकतो म्हणून त्या चेतना शक्ती कात्यायनीचे स्मरण करायचे
*या देवी सर्व भुतेषु चित्तीरुपेण संस्थीता*
*नमः तस्यै नमः तस्यै नमः तस्यै नमो नमः*
शैलजा भालेराव , कोपरगाव.
सौजन्य – सामिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र