आज एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्स आणि श्रीलंका यांच्यात विश्वचषकाचा १९ वा सामना तर २० व्या सामन्यात विश्वविजेता इंग्लंडचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे
लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर नेदरलँड्स आणि श्रीलंका आज एकमेकांशी भिडणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघाला काही खास कामगिरी करता आली नाही. दोन्ही संघांनी या स्पर्धेत प्रत्येकी तीन-तीन सामने खेळले आहेत. मात्र, नेदरलँड्च्या संघाने त्यांच्या शेवटच्या सामन्यात बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पुनरागमन केले. परंतु, श्रीलंकेचा संघ अजूनही त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. आज दुपारी २ वाजता ह्या सामन्याला सुरवात झाली असून नेदरलँड्सने पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
. विश्वविजेता इंग्लंडआणि दक्षिण आफ्रिकेचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी २ वाजता सुरुवात झाली असून दोन्ही संघ विजय मिळवून उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्याचे लक्ष्य ठेवणार आहेत. हा सामना इंग्लंडसाठी खूप महत्त्वाचा आहे. येथील पराभवामुळे इंग्लंडचा उपांत्य फेरीचा मार्ग अशक्य होऊ शकतो. तत्पूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.