सध्या भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना ठार मारण्याची मालिका पाकिस्तानमध्ये सुरु असल्याचे दिसून येत आहे.अलीकडेच, या यादीत दोन नवीन नावे समोर आली होती, त्यापैकी एक शाहिद लतीफ होता, जो पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचे म्हटले जाते. तर दुसरा दहशतवादी आयएसआय एजंट मुल्ला बहूर उर्फ होर्मुझ आहे, जो पाकिस्तानमध्ये अज्ञात लोकांच्या गोळीबाराचा बळी ठरला होता .आता दाऊद मलिक याची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली असून तो ‘जैश-ए-मोहम्मद’ या जागतिक दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा जवळचा असल्याचे बोलले जात आहे.’जैश-ए-मोहम्मद’ व्यतिरिक्त दाऊद मलिक लष्कर-ए-जब्बार आणि लष्कर-ए-जंगवीशीही संबंधित होता. मसूद अझहर, हाफिज सईद, लखवी आणि दाऊद मलिक इत्यादींना भारत सरकारने UAPA अंतर्गत दहशतवादी घोषित केले होते.
पाकिस्तानमधील उत्तर वझिरीस्तानमधील मिराली भागात मुखवटाधारी बंदूकधाऱ्यांनी वॉन्टेड अतिरेक्यावर गोळीबार केल्यानंतर दाऊद मलिक मारला गेल्याचे वृत्त आहे.