पुण्यातील वेगवेगळ्या उत्सवादरम्यान होणाऱ्या डी जे आणि लेझरच्या वापराविरोधात विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील जुन्या जाणकार मंडळी यांच्याकडून याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य शासन जोपर्यंत नियमावली विकसित करत नाही आणि त्याची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत सार्वजनिक ठिकाणी धोकादायक लेझर बीम विक्री आणि वापरावर पूर्ण बंदी आणावी, अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
पुण्यातील “वाडेश्वर कट्टा” मध्ये असणाऱ्या डॉ सतीश देसाई, श्रीकांत शिरोळे, अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, संदीप खर्डेकर यांच्याकडून याचिका दाखल करण्यात आली आहे.
वाढलेल्या ध्वनिपातळीचा त्रास झाल्याबाबत पुणेकरांकडून समाजमाध्यमांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.