श्वेते वृषे समारूढा
श्वेताम्बरधरा शुचि:।
महगौरी शुभं दान्महादेवप्रमोददा।।
दुर्गा मातेचे आठवे रूप म्हणजे महागौरी !
या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे.
हिचे वय आठ वर्ष मानले जाते, ‘अष्टवर्षा भवेद् गौरी।’
तीचे वस्त्र आणि आभूषणदेखील श्वेत रंगाचीच आहेत.
महागौरीला चार भुजा आहेत. वृषभ तिचे वाहन आहे.
तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या डाव्या हातात डमरू आणि खालील डावा हात वर-मुद्रेचा आहे.
महागौरी अत्यंत शांत स्वभावाची आहे.
आपल्या पार्वती रूपात तिने भगवान शंकराला प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती.
गोस्वामी तुलसीदास वर्णन करतात
जन्म कोटी लगी रगर हमारी
बरॐ संभु न त रहॐ कुँआरी।।
महागौरी म्हणजे जिला गौरवर्ण प्राप्त झाला आहे अशी
परंतु गौर वर्ण म्हणजे गोरी एवढाच अर्थ अभिप्रेत नाही तर प्रतिभेच्या, बुध्दीच्या तेजाने तळपते अशी ही गौरी
गौरी म्हणजे पार्वती
ही हरितालिका व्रतात पूजली जाते.
जेष्ठागौरी ,चैत्रगौरी पूजली जाते.
लक्ष्मीपेक्षा पार्वती पूजनाला स्त्रियांनी अग्रस्थान दिलंय
लक्ष्मी हवीय पण ती चंचल असते
तर पार्वती दृढनिश्चयी ठाम असते.
संसाराचा गाडा नीट चालविण्यासाठी स्त्रीने ठाम रहाणं आवश्यक आहे चंचल असून कसं चालेल ॽ
फक्त रुपाचा अभिमान न बाळगता आपल्यातील प्रतिभा ओळखून ती जोपासण्यासाठी महागौरीच स्मरण करा
या देवी सर्व भूतेषू
कांती रुपेण संस्थिता
नमः तस्यै नमः तस्यै
नमः तस्यै नमो नमः
सुलभा संजय देशपांडे ,कोपरगाव.
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र