सिद्धगन्धर्वयक्षारसुरैरमरैरपि।
सेव्यमाना सदा भूयात्
सिद्धीदा सिद्धीदायिनी।।
दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री होय.
सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती किंवा ध्यान करण्याची क्षमता
आणि धात्री म्हणजे दाता किंवा पुरस्कार देणारा.
अणिमा, महिमा, गरीमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत.
देवी सिद्धीदात्रीत या सर्व सिद्धी आपल्या भक्ताला प्रदान करण्याची क्षमता आहे.
भगवान शंकराने देवीच्या कृपेनेच या सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. यामुळेच शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते. या कारणामुळे त्यांना लोक ‘अर्धनारीनटेश्वर’ या नावाने ओळखतात.
देवी सिद्धीदात्री चार भुजाधारी आहे. तिचे मुख्य वाहन सिंह असेल तरी ती कमळाच्या फूलावरही विराजमान असते.
वन्दे वांछित मनोरथार्थ चन्द्रार्घकृत शेखराम्।
कमलस्थितां चतुर्भुजा सिद्धीदात्री यशस्वनीम्॥
सुलभा संजय देशपांडे ,कोपरगाव.
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र