भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांचे निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. बेदी यांच्या पश्चात त्यांचा मुलगा आणि बॉलीवूड अभिनेता अंगद बेदी आहे
त्यांनी भारतासाठी एकूण ७७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यांनी २७३ विकेट्स घेतल्या होत्या. बेदी हे भारतातील एक सर्वोत्तम लेफ्ट आर्म स्पिनर होते.बिशन सिंग बेदींना भारतीय फिरकीचा पाया रचण्यासाठी ओळखले जाते. इरापल्ली प्रसन्ना, बीएस चंद्रशेखर आणि एस व्यंकटराघवन यांच्यासह बिशन सिंग यांच्या फिरकी स्पेशल चौकडीने एक काळ गाजवला होता.
बिशन सिंग बेदी यांनी २२ कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व देखील केले होते. बेदी हे 1967 ते 1979 पर्यंत क्रिकेटच्या मैदानात सक्रीय होते. त्यात त्यांनी भारताकडून ६७ कसोटी सामने खेळले आणि २६६ विकेट्स घेतल्या. त्यांनी भारताकडून १० वनडे सामने देखील खेळले होते. त्यात त्यांनी ७ विकेट्स घेतल्या.होत्या.